सराफ बाजार ते सोनार कुंठ मार्ग महिनाभरासाठी बंद! काँक्रीटीकरणाचे काम हाती; २३ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान वाहतुकीस बंदी…

सराफ बाजार ते सोनार कुंठ मार्ग महिनाभरासाठी बंद! काँक्रीटीकरणाचे काम हाती; २३ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान वाहतुकीस बंदी…

नंदुरबार || दि. 22 नोव्हेंबर 2026 || (फिरोज खान ) :- नंदुरबार शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग असलेला सराफ बाजार ते सोनार कुंठ हा रस्ता तब्बल महिनाभरासाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून, २३ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२६ या कालावधीत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

काँक्रीटीकरणासाठी नगरपालिकेचा निर्णय!

सराफ बाजार परिसरात नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने वाहनधारकांना आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन!

रस्त्याच्या कामामुळे वाहतूक बंद असलेल्या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये जळका बाजार ते शिवाजी रोड तसेच कमानी दरवाजा मार्गे गणपती मंदिर रोड या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे. दरम्यान, काँक्रीटीकरणाच्या कामामुळे महिनाभर नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार असला, तरी काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना चांगला आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Call Us