निजामपूर येथे जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
निजामपूर/धुळे || दि.२६ ऑक्टोंबर २०२४ || प्रतिनिधी {परवेज सय्यद}-: मा.पोलीस अधीक्षक, धुळे श्रीकांत धिवरे यांनी गुटखा, अवैध दारु, गावठी हातभट्टी व इतर अवैध धंदे यांचेवर छापे टाकुन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार दि.26/10/2024 रोजी पोलीस निरीक्षक, श्रीराम पवार, स्था. गु. शा. धुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की, निजामपुर पोलीस स्टेशन हददीत जैताणे ता. साक्री येथील सावित्रीबाई फुले चौक येथे घराच्या आडोश्याला काही ईसम स्वतःच्या फायदयासाठी विनापरवाना तीन पत्त्याचा जुगार खेळत आहे. त्याअनुषंगाने पथक तयार करुन कारवाई करण्याचे निर्देश दिले असता, जैताणे ता. साक्री येथील सावित्रीबाई फुले चौक येथे घराच्या आडोश्याला ईसम नामे
१) बापु गंगाराम धनगर वय ४० वर्षे, रा. जैताणे ता. साक्री
२) ज्ञानेश्वर काळू पेंढारे वय २४ वर्षे रा. जैताणे ता. साक्री
३) जगदीश राजेंद्र आढावे वय २२ वर्षे रा. जैताणे
४) गोपाळ बापु सोनवणे वय २२ वर्षे रा. भामेर ता. साक्री
५) दिनेश संजय माळी वय २४ वर्षे रा. भामेर ता. साक्री
६) रविंद्र पावबा जाधव वय ४२ वर्षे रा. जैताणे ता. साक्री
७)महेश सुदाम जयस्वाल वय ४२ वर्षे रा. निजामपुर ता. साक्री
८) अनिल रोहीदास बच्छाव वय३५ वर्षे रा. जैताणे ता. साक्री
९) कष्णा दादाजी सोनवणे वय १९ वर्षे रा. जैताणे ता. साक्री
१०) चंद्रकांत सुनिल जाधव वय ३५ वर्षे रा. जैताणे ता. साक्री हे जुगारचा खेळ खेळतांना मिळुन आले. सदर इसमांची अंगझडती घेता त्यांचे ताब्यात एकुण १,८५,९३० /- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आला आहे.
अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकुण :- 1,85,930/- रु. किं.चा मुददेमाल हस्तगत करुन 10 आरोपीतांविरुध्द, निजामपुर पोलीस स्टेशन येथे मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई/अमरजीत मोरे, पोहेकॉ.सदेसिंग चव्हाण, पोहेकॉ. तुषार सुर्यवंशी, पोकॉ. गुणवंत पाटील, पोकॉ.अतुल निकम अशांनी केली आहे.