*कॉपर केबल चोरी करणारी टोळी २४ तासाच्या आत गजाआड !*
*निजामपूर पोलिसांची कारवाई*
निजाम पुर धुळे दि .३० ऑक्टोंबर ( सैय्यद परवेज ) :-
दि.२७/१०/२०२४ रोजी रात्री ०२.३० वाजेच्या सुमारास निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सालटेक गाव शिवारातील गेल सोलर कंपनीच्या कंपाऊंड मधील ब्लॉक क्रमांक ४८ मधील ६९,०००/- हजार रुपये किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली होती .
त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ३१५/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे दि.२७/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा
असल्याने सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे
०१ ) देविदास बंडु थोरात, रा. रायपुर ता. साक्री जि.धुळे,
२) देविदास वेडु वाघमोडे,
३) रविंद्र धवळु कारंडे,
४) ज्ञानेश्वर दामु कारंडे,
५) बापु लहानु कारंडे सर्व रा. धमनार ता. साक्री जि.धुळे यांना गुन्हा घडल्याचा २४ तासाच्या
आत ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेलेल्या मुद्देमाल कॉपर केबल वायर व गुन्हा करतांना वापरलेली मोटार सायकल तसेच लोखंडी कटर असे एकुण १,०९,०००/- रुपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे, किशोर काळे,अपर पोलीस अधिक्षक, धुळे, एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे,पोलीस उप निरीक्षक प्रदिप सोनवणे, यशवंत भामरे, मधुकर सोमासे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रतन मोरे, प्रदिप आखाडे,पोलीस नाईक खंडेराव पवार, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर
चव्हाण, प्रविण पवार, श्रीराम पदमर, फुलसिंग वसावे, पृथ्वीराज शिंदे,चालक पोलीस शिपाई अमरसिंग पवार यांचे पथकाने केली आहे.