मुक्ताईनगर पोलिसांची अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वर कार्यवाही…

मुक्ताईनगर पोलिसांची अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वर कार्यवाही…

मुक्ताईनगर || दि.०३ डिसेंबर २०२४ || {प्रतिनिधी विठ्ठल भालेराव} -: दि 01/12/2024 रोजी मुक्ताईनगर पोलिसांना पो.ह दीपक माळी, रवींद्र पाटील मिळालेल्या गुप्त माहिती नुसार महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या प्रतिबंधित गुटखा हा मालत ट्रक क्र एन एल 01 ए जे 1725 यात दिल्लीहून मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रातील मुक्ताईनगर मार्गे मुंबईतील वसई येथे जात आहे त्यावरून श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थागुशा जळगांव यांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

त्याप्रमाणे दि 01/12/2024 रोजी पूरनाड फाटा मुक्ताईनगर येथे मिळालेल्या माहितीतील ट्रक क्र एन एल 01 ए जे 1725 थांबवून त्यातील मालाची खात्री केली असता सदर मालट्रक मध्ये 1 कोटी 78 लाख 66 हजार 080 रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला प्रतिबंधित गुटखा मिळून आला असून त्यावर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात मिळालेला प्रतिबंधित गुटखा मिळून मालट्रक व इतर मुद्देमाल असा एकूण 2 कोटी 8 लाख 82 हजार 580 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस उपनिरीक्षक श्री दत्तात्रय पोटे, पोह दिपक माळी,रवींद्र पाटील, मुरलीधर धनगर, सचिन पोळ आशा सर्व स्थगुशा जळगांव अशांनी केली आहे. सदरची कार्यवाही मा डॉ श्री महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक जळगांव, मा श्रीमती कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव (जळगांव चार्ज), मा श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थागुशा जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली कऱण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us