नंदुरबार नॅशनल गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रीडा स्पर्धा संपन्न….
नंदुरबार || दि.०१ जानेवारी २०२५ || {फिरोज खान}-: महाराष्ट्र विविध विधायक कार्य समिती संचलित नॅशनल गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
विद्यार्थिनींचे बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास घडविण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थिनी मध्ये क्रीडा विषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या मध्ये क्रिकेट, डॉज बॉल, शंभर मीटर धावणे, लिंबू चमचा या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तर फनीगॅम मध्ये फुगा फोडणे, मटकी फोडणे, बॉक्समध्ये चेंडू टाकणे आदी स्पर्धा घेण्यात आली.
प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक अल्ताफ़ हुसैन यांच्या हस्ते झंडी दाखवून उदघाटन करण्यात आले. या वेळी क्रीडा शिक्षक शेख असलम सर यांनी खेळ कसा खेळावा त्याविषयीच्या संदर्भात खेळाडूंना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक शेख अल्ताफ हुसेन यांनी विविध मैदानी खेळातील माहिती व खेळांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच पर्यवेक्षक कुरेशी अब्दुल रहीम सर यांनी विद्यार्थिनींना क्रीडा स्पर्धा मध्ये खेळाडू वृत्तीने सहभागी होऊन स्वतः जिंकण्यासाठी खेळायचे असते दुसऱ्याला हरवण्यासाठी नाही असे मार्गदर्शन केले. खेळांची चार हाऊस बनवून (येल्लो, ग्रीन, रेड, ब्लू) असे चार गटांत विभागणी करण्यात आली होती.
विद्यार्थिनींनी कौशल्य पणाला लावून उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले व उपस्थितांची वाहवाह मिळविली. स्पर्धा यशस्वितेसाठी हाजी अल्ताफ़ रज़ी सर, काज़ी नावेद सर, निकहत बेगम, खान अब्दुल्लाह सर, सैय्यद ज़ैद सर, पर्यवेक्षक कुरेशी अब्दुल रहीम सर, हाजी फारुक सर, इनामदार अब्दुर्रब सर, हिना मॅडम पठाण सोहेल सर, खाटीक नीलुफर मॅडम, तसेच मोहसिन सर, नदीम सर, नाज़िमभैय्या, आरिफ़ भैय्या, अबरार भाई, यांनी परिश्रम घेतले.