बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..!
नंदुरबार || दि. ९ ऑक्टॉबर २०२५ || फिरोज खान)-: एकुण 2 लाख 13 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, 02 आरोपी ताब्यात..दिनांक 08/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, एका काळया रंगाच्या होंडा कंपनीचे मोटारसायकल क्रमांक MH 18 CG 2563 हिचेवर दोन इसम अंदाजे वय 20 ते 25 वर्षे असलेले त्यातील पुढील इसमाने निळया रंगाचा टी-शर्ट परिधान केलेले असुन मागे बसलेल्या इसमाने जांभळया रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. त्यांचे जवळ एक काळया रंगाची सॅक (बॅग) असुन त्यामध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ आहे.
सदर इसम शिरपूरकडून शहादाकडे येणार असुन सदर इसम हे स्वतःचे आर्थिक फायदयसाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक सुका गांजाची विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करणार आहे, अशी खात्रिशीर माहिती मिळालेवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास माहिती कळवून कारवाई करणेस सांगितले.मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे पोलीस पथक हे सारंगखेडा दोंडाईचा रस्त्याने अनरदबारी मार्गे शिरपुरकडे जाणाऱ्या रस्त्याने कहाटूळ फाटा येथे एका ठिकाणी उभे असतांना काही वेळानंतर मिळालेल्या गोपनिय माहितीचे वर्णनाप्रमाणे एक काळया रंगाच्या होंडा कंपनीचे मोटारसायकलवर दोन इसम हे येतांना दिसले, सदर वाहनावरील मागे बसलेल्या इसमाचे पाठीमागे सॅक (बॅग) दिसत होती.
पथकास त्यांचेवर संशय बळावल्याने त्यांना पथकाने पकडले असता सदर वाहनाचा क्रमांक MH 18 CG 2563 असा होता. वाहनावरील इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्याची नावे अनुक्रमे चालक 1. संतोष देवसिंग पावरा, वय- 20 वर्षे, रा. गधडदेव, ता. शिरपूर जि. धुळे व त्याचे पाठीमागील इसम नामे 2. किरण आप्पा डामरे, वय 22 वर्षे, रा. मलगाव, ता. शहादा, जि. नंदुरबार असे सांगितले. त्यांना त्यांचे ताब्यातील असलेल्या सॅक (बॅग) मध्ये काय आहे बाबत विचारणा करता ते घाबरुन जाऊन उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यावेळी त्यांचेवर अधिक संशय बळावल्याने त्यांचे सॅक (बॅग)ची पथकाकडून तपासणी करता त्यामध्ये बेकायदेशीररित्या अंबुस उग्र वासाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ पथकास मिळुन आल्याने सदर इसमांना लागलीच पोलीस पथकाने ताब्यात घेतले.सदर इसमांकडुन एकुण 06 किलो 675 ग्रॅम वजनाचा सुका गांजा (अंमली पदार्थ) व 01 वाहन असा एकुण 02,13,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
त्याअन्वये वर नमुद आरोपी क्र. 1 व 2 यांचेविरुध्द सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.- 164/2025 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 चे कलम 20 (ब), 22(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थागुशा पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ/पुरुषोत्तम सोनार, सचिन वसावे, पोना/विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोशि/शोएब शेख, भरत उगले अशांनी केली आहे.
