आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरुविषयी केलेल्या अपमानजनक शब्दाबद्दल निषेध त्यांच्या अटकेची व राजीनाम्याची मागणी…

आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरुविषयी केलेल्या
अपमानजनक शब्दाबद्दल निषेध त्यांच्या अटकेची व राजीनाम्याची मागणी…

जळगाव || दि.२७ जुन २०२५ || {विठ्ठल भालेराव} –: मा. मंत्री गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरूंविषयी केलेल्या अति दूषित, अपमानजनक आणि द्वेषयुक्त वक्तव्याचा सर्व जळगाव जिल्ह्यातील ख्रिस्ती समाज, धर्मगुरू, पालक वर्ग, चर्च सभासद, मुस्लीम समाज, तसेच सर्व समाजातील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

मा. मंत्री महोदयांनी केलेल्या “धर्मगुरूंचा सैराट करा म्हणजेच मार” अशा स्वरूपाच्या विधानामुळे धार्मिक सलोखा धोक्यात येऊ शकतो आणि समाजात द्वेषाची बीजे रोवली जाऊ शकतात. अशा वक्तव्यांची आम्ही कठोर शब्दांत निंदा करतो आणि शासनाने अशा वक्तव्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

आज जळगाव जिल्हाधिकारी साहेबांना याबाबत अधिकृत निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे आम्ही आमचा आक्रोश आणि चिंता व्यक्त केली आहे.

निवेदन देताना उपस्थित:
पा. स्वप्नील नाशिककर
पा. सरीचंद चौहान
पा. थॉमस पवार
पा. शमुवेल खरात
पा. संजय चौधरी
पा. सौ. डायना गायकवाड
पा. अनिल साळवे
पास्टर वळवी
पास्टर प्रसाद वानखडे
पास्टर फ्रांसिस सर
सर्व जळगाव जिल्हा पास्टर असोसिएशनचे सदस्य तसेच मुस्लिम समाजातील प्रतिनिधी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अब्दुल करीम सालार साहेब आणि कादरिया फेडरेशनचे अध्यक्ष मा. फारुक कादरी साहेब यांचीही उपस्थिती लाभली आणि त्यांनी ख्रिस्ती समाजाच्या समर्थनार्थ आपला पाठिंबा दर्शविला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us