जिल्हा पोलीस मुख्यालयातील नूतनीकरण केलेल्या “एकलव्य” बॅडमिंटन हॉलचे पालकमंत्री मा.ना.हसन मुश्रीफ यांचे हस्ते उद्घाटन..!

जिल्हा पोलीस मुख्यालयातील नूतनीकरण केलेल्या “एकलव्य” बॅडमिंटन हॉलचे पालकमंत्री मा.ना.हसन मुश्रीफ यांचे हस्ते उद्घाटन..!

नंदुरबार, दि.१८ एप्रिल २०२६ (फिरोज खान) :- दि.17/04/2026 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालय येथे डी.पी.डी.सी. मार्फतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या “एकलव्य” बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन मा. वैदयकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले.

सदर बॅडमिंटन हॉलचे अलीकडेच आधुनिक सुविधांसह नूतनीकरण करण्यात आले असून, पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी शारीरिक तंदुरूस्तीबरोबरच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी हा हॉल उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यक्रमावेळी वैदयकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्हयाचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, विधान परिषद सदस्य आ. चंद्रकांत रघुवंशी, विधानसभा सदस्य आ. राजेश पाडवी, विधानसभा सदस्य आ.शिरीषकुमार नाईक, विधानसभा सदस्य आ. आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सा.बां. कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, उपविभागीय अधिकारी सा.बां. विभाग गणपत गावीत, शाखा अभियंता राजु मार्तंड तसेच इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते.

Call Us