पाळधीत मंत्री गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्यामुळे मोठा राडा; सध्या संचारबंदी..

पाळधीत मंत्री गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्यामुळे मोठा राडा; सध्या संचारबंदी..

जळगाव || दि.०१ जानेवारी २०२५ || {प्रतिनिधि विठ्ठल भालेराव}-: जळगाव पासून काही अंतरावर असलेले मंत्री गुलाबराव पाटलांच्या गाव पाळधी गावात काल दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी मंत्री गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरने गाडीचा हॉर्न वाजवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून सध्या पाळधी गावात कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या रात्री जळगावात मोठा राडा शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यात त्यांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याच्या व कारला कट मारल्याच्या रागातून वाद झाला असुन यामुळे जमावाने वाहने आणि दुकाने जाळल्याचा प्रकार काल रात्री घडलेला आहे.

सध्या पाळधी गावात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे आता परिस्थिती नियंत्रणात असुन मंत्री गुलाबराव पाटलांच्या कुटुंबाला घेऊन त्यांचा ड्रायव्हर रस्त्याने जात असताना यावेळी ड्रायव्हरने हॉर्न वाजविला आणि कारला कट मारल्याच्या रागातून वाद सुरु झाला. यामुळे पाळधी गावातील काही तरुण जमा झाले. याची खबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लागताच ते देखील तिथे दाखल झाले. यामुळे गोंधळ सुरु झाला व दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. या घटनेत १२-१५ दुकाने जाळण्यात आली आहेत.

पाळधी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. २०-२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी म्हटले आहे. अंतर्गत वादातून दोन गटात हा वाद झाला झाला असून पोलीस घटनेची चौकशी करत असून पुढील संशयित आरोपींवरती गुन्हे दाखल करण्याचा काम करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us