विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी आनंद बाजार : न.पा.ऊर्दू शाळा क्रमांक ११ नंदुरबार येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
नंदुरबार दि .१८ जानेवारी ( फिरोज खान ) :-
नंदुरबार शहरातील नगर पालिका ऊर्दू शाळा क्रमांक ११ येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
विद्यार्थ्यांना व्यावहारिक व सामाजिक जीवनातील अनुभव घेता यावा म्हणून बाल आनंद मेळावा आयोजीत केला होता,या कार्यक्रमाचे उद्धाटन पालकांच्या उपस्थितीत शाळेचे प्रा,मुख्याध्यापिका खान शगुफ़ता मॅडम यांचा हस्ते करण्यात आले
बाल आनंद मेळावा विद्यार्थांना गणितीय ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता यावा नफा – तोटा ही संकल्पना प्रत्यक्षात समजण्यासाठी आर्थिक अत्पन्नाचा महत्व कळण्यासाठी व सामाजिक जीवनातील आर्थिक उलाढाल कशा प्रकारे चालतो याची जाणीव विद्यार्थांना व्हावी म्हणून बाल आनंद मेळावा आयोजन केले होते
आनंद मेळावा हा विद्यार्थांना व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी आयोजीत केला जातो ,या मेळाव्यात विद्यार्थ्यी स्वतः स्टॉल लावून विक्री करतात आणि आपली सृजनशिलता दाखवतात
या खाऊ मेळाव्यात विद्यार्थिनी स्वयंस्फूर्तीने विविध खाद्यपदार्थांचे दुकाने मांडण्यात आली होती ,विद्यार्थ्यांनी मावा गुलाब जमून ,पाणी पुरी ,मेजेदार पोंगे बटाटे ,जायकेदार रगडा पापड ,मसालेदार पास्ता ,चटपटी भेळ ,मुंबईय्या सँडविच आदी खाद्य पदार्थांचे दुकाने लावली होती
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य व पालकांसह परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला ,बाल आनंद मेळावा पार पाडण्यासाठी शाळेचे प्रा,मुख्याध्यापिका खान शगुफ़ता मॅडम ,शिक्षक जुलमिन्न शेख सर ,खालील धोबी सर शिक्षिका अकिला धोबी मॅडम,हिना मेहतर मॅडम यांनी परिश्रम घेतले ,
या बाल आनंद मेळाव्यानिमित्त विद्यार्थ्यांना नफा – तोटा व्यवहार ज्ञान तसेच संवाद कौशल्य आदींची माहिती झाली