कॉपर केबल चोरी करणारी पुष्पा टोळी गजाआड, निजामपुर पोलीसांची धडक कारवाई

कॉपर केबल चोरी करणारी पुष्पा टोळी गजाआड, निजामपुर पोलीसांची धडक कारवाई

धुळे निजामपुर : दि .२० जानेवारी ( सैय्यद परवेज ) :-

धुळे जिल्ह्यातील निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील टिटाणे गावाचे शिवारात दिनांक २०/०१/२०२५ रोजी पहाटे ०३.०० ते ०३.३० वाजेच्या सुमारास सुजलॉन ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीचे टॉवर क्रमांक के – १३८ मधील १,९७,००० /- रुपये
किंमतीची कॉपर कॅबल वायर चोरीस गेली होती त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ००११/२०२५ भा.न्या.सं.
कलम ३०५,३३१(३),३३१ (४), ३(५) प्रमाणे दि.२०/०१/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व प्रत्यक्षदर्शी साक्षींदारांना केलेल्या तपासावरुन नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे ०१. आसीफ शहा कासम शहा, २) वसीम जुमाशाह,
३)आमिन करीम शहा,
४) प्रवीण सुनिल बागले सर्व रा. जैताणे ता. साक्री जि.धुळे
५) घनश्याम रविंद्र अहीरराव
६) रविंद्र भाऊसाहेब देवरे दोन्ही रा. टिटाणे ता. साक्री यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेलेल्या
मुद्देमाल कॉपर केबल वायर व गुन्हा करतांना वापरलेल्या १) स्कोडा कंपनीची गाडी क्र. एम एच-०४ ई एफ -४५९०सिल्वर रंगरची जु.वा. की. अ. २) मारुती इको एम एच – १८ बी एक्स – ८२६१ पांढऱ्या रंगाची जु. वा. की. अ. असे गुन्ह्यात
वापरेल्या दोन वाहनांसह एकुण ८,९७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन जप्त करुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे,किशोर काळे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उप निरीक्षक प्रदिप सोनवणे, मधुकर सोमासे, पोलीस शिपाई प्रभाकर गवळे, रुपसिंग वळवी, प्रशांत ठाकुर, नारायण माळचे, रतन मोरे, नागेश्वर सोनवणे, प्रदिप आखाडे, खंडेराव पवार, सागर थाटसिंगारे, कृष्णा भिल, रामभाऊ गायकवाड, परमेश्वर चव्हाण,गौतम अहिरे, मनोज देवरे यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us