अक्कलकुवा येथे अवैध गुटखा बाळगून विक्री करणारा इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..
एकुण 1 लाख 32 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत..!
नंदुरबार दि.११ सप्टेंबर २०२५ (फिरोज खान) :- नंदुरबार आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अक्कलकुवा पोलीस ठाणे हददीतील शिवनेरी चौकात सुरज परदेशी नामक इसम हा त्याचे राहते घरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा स्वतःचे कब्जात बाळगुन त्याची अवैधरित्या विक्री करीत आहे,
बाबत खात्रिशीर माहिती मिळालेवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी लागलीच स्था.गु.शा. पथकास रवाना केले.
मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीस पथकाने स्थानिक पोलोस ठाणे यांचे मदतीने शिवनेरी चौकात सुरज परदेशी याचे घराजवळ जाऊन त्यास बोलविले असता त्याचे घरात संशयितरित्या हालचाली सुरु झाल्या. त्यावरुन पोलीस पथकास अधिकचा संशय बळविला. त्यावेळी पथकाने त्याचे राहते घरात छापा कारवाई केली असता त्याचे घरात पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्या. त्याची तपासणी करता त्यामध्ये विविध प्रकारचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, तंबाखु इ. असा एकुण 1,32,650/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
त्याअन्वये इसम नामे सुरज राजेश परदेशी, वय 28, वर्षे, रा. शिवनेरी चौक, अक्कलकुवा, जि. नंदुरबार याचेविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 814/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 275 सह अन्न सुरक्षा व मानके अधि. 2006 चे कलम 26 (2) (iv), 30 (2) (a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि. मुकेश पवार, पोहेकॉ महेंद्र नगराळे, दादाभाई मासुळ, पोना/चेतन साळवे, नितीन गांगुर्डे अशांनी केली आहे.
