बनावट देशी दारुचा कारखाना उध्द्वस्त, लाखो रुपये किमतीच्या मुद्देमालासह 01 आरोपी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..!!

बनावट देशी दारुचा कारखाना उध्द्वस्त, 10 लाख 17 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह 01 आरोपी ताब्यात..!!
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ..!!

नंदुरबार दि. १८ जुन २०२६ (फिरोज खान) :- नंदुरबार जिल्ह्यात अवैध बनावट दारुची निर्मिती, वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, घातक शस्त्र, अंमली पदार्थांची लागवड व साठवणूक, विमल गुटखा इत्यादींबाबत माहिती काढून त्यांचेवर जास्तीत जास्त प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.

दिनांक 17/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील जुगनी गावातील दुगलीबारी पाड्यात एक इसम स्पिरीटचा वापर करुन बनावट देशी तयार करीत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जावून माहिती घेतली असता एका कौलारु घराजवळ स्पिरीटचा वास येत होता म्हणून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्या कौलारु घराच्या खिडकीमधून पाहिले असता एक इसम बाटलीमध्ये काही तरी भरतांना दिसला म्हणून पथकाने कौलारु घरात प्रवेश करुन घरात इसमाला ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव लक्ष्मण हात्या पाडवी वय-31 वर्षे रा. तलावडी पोस्ट धनाजे बु. ता. धडगांव जि. नंदुरबार असे सांगितले.

सदर घराची पाहणी केली असता तेथे खालील प्रमाणे अवैध बनावट दारु, दारु बनविण्याकामी उपयोगी पडणारे स्पिरीट, साहित्य मिळून आले. 1,56,000/- रु.किं. चे बनावट देशी दारु दूंगो पंचचे एकूण 39 बॉक्स. 45,000/-रु.किं.चे बनावट दारु बनविण्याकामी उपयोगी पडणारे एकूण 150 लीटर स्पिरीट, 1,00,000/- रु.किं.चे दारुच्या बाटल्यांना बुच पॅकींग करणारे असलेले ईलेक्ट्रीक मशीन, 1,16,500/- रु.किं.चे दारु बनविण्याकामी उपयोगी पडणारे साहित्य, 7,00,000/- रु.किं.चे एक बोलेरो कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक MH 39 J0944
एकुण 10,17,500/-

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून वर नमुद साहित्य कायदेशीर प्रक्रिया जप्त करुन त्यांच्याविरुध्द् म्हसावद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 229/2026 भारतीय न्यायसंहीता 2023 चे कलम 123 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलीस हवालदार मुकेश तावडे, सुनिल येलवे, दिनेश चित्ते, विशाल नागरे, जितेंद्र पाडवी, पुरुषोत्तम सोनार, पोलीस नाईक चेतन साळवे, पोलीस अंलदार विनोद पाटील, मनोज महाजन, अभय राजपुत यांचे पथकाने केली आहे.

Call Us