धुळे शहरात दिवाळीच्या आनंदात विरजण; चाळीसगाव रोडवरील ‘पटेल सर्व्हिस स्टेशन’ला भीषण आग; १० लाख ४० हजारांचे नुकसान

फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; दोन चारचाकी वाहनांसह गॅरेजमधील मशिनरी जळून खाक.

धुळे: काकर वाहिद

धुळे शहरात दिवाळीचा सण उत्साहात सुरू असताना चाळीसगाव रोड परिसरामध्ये एका भीषण आगीची दुर्घटना घडली आहे. म्हाडा बिल्डिंगसमोरील ‘पटेल सर्व्हिस स्टेशन’ आणि गॅरेजमध्ये मध्यरात्री अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकी घटना?

चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या दैनंदिनीतील (जी.डी. नं. ०१३) अधिकृत माहितीनुसार, फिर्यादी दानिश शकील पटेल (वय ४०, रा. आयशा कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) यांचे चाळीसगाव रोडवर म्हाडा बिल्डिंगसमोर ‘पटेल सर्व्हिस स्टेशन’ व गॅरेज आहे.
दि. ०८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून ते दि. ०९ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ०१:३० वाजेच्या दरम्यान ही दुर्घटनेची वेळ आहे. दिवाळीचा सण सुरू असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जात होते.

याचदरम्यान फटाक्यांमुळे गॅरेजमध्ये आग लागल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आगीत झालेले नुकसान (अंदाजे रु. १०,४०,०००/-):
* महिंद्रा बोलेरो गाडी (पांढरा रंग, क्र. जीजे २२ एच २०१३): किंमत अंदाजे ४,५०,०००/- रुपये.
* महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी (पांढरा व सिल्हर रंग, क्र. एमएच १८ टी ८७८): किंमत अंदाजे ४,५०,०००/- रुपये.
* स्कूटर (सिल्वर रंग, क्र. एमएच १८ वाय ४८२२): किंमत अंदाजे ५०,०००/- रुपये.
* मशिनरी (कार वॉशर, ग्रीस पंप, एअर कॉम्प्रेसर हवा भरण्याचे मशिन): किंमत अंदाजे ९०,०००/- रुपये.

Call Us