जिल्हा पोलीस दलातर्फे प्रत्येक शनिवारी “तक्रार निवारण दिनाचे” आयोजन..!
नंदुरबार || दि. १४ मे २०२६ || (फिरोज खान) :- नंदुरबार – जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांचे काही तक्रारी/समस्या असल्यास त्याचे लागलीच निवारण होऊन नागरिकांचा वेळ वाचावा व सोशल पोलिसींगचे माध्यमातून जनतेशी संवाद साधता यावा, या उददेशाने प्रत्येक शनिवारी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांसाठी “तक्रार निवारण दिन” आयोजित करण्याचा स्त्युत्य उपक्रम यापुर्वीपासुन सुरू आहे.
यामध्ये जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यात नागरिकांचे समस्यांचे तात्काळ निराकरण करुन त्यांना योग्य कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने येत्या शनिवार दि. 16/05/2026 रोजी पासुन महिन्याचे प्रत्येक शनिवारी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यात सकाळी 11.00 ते 01.00 वाजेदरम्यान तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले असुन नागरिकांनी सदर तक्रार निवारण दिनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
