जिल्हा परिषद उर्दू शाळा पिंपळनेर येथे प्रवेशोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न व VR लॅबचे उद्धाटन ….
धुळे/पिंपळनेर दि. २४ एप्रिल २०२६ (नईम अली) :- धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने नवीन प्रवेशोत्सव आणि गेल्या वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहापूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमचे अध्यक्ष पिंपळनेर बिटचे विस्ताराधिकारी तथा शालेय पोषण आहारचे अध्यक्ष संजीव विभांडिक हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, विस्ताराधिकारी पवार, पिंपळनेर केंद्र प्रमुख मुकेश बाविस्कर, मौलना अबरार काद्री, जहूर जागीरदार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नईम अली, उपाध्यक्ष नेहाल शेख, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसीम अली सैय्यद, अय्युब पठाण, नोषाद सैय्यद, अल्ताफ शेख,शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष सलीम कुरेशी, बलाहणेचे केंद्र प्रमुख जाधव सर, शिक्षक संघटनाचे अध्यक्ष अनिल तोरोने सर कानडे सर, भदाणे सर गवळी सर आदी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम कुरआन पाक ची आयत पठण करून करण्यात आली व आलेल्या मान्यवरांचे स्वागत पुष्पगुछ देऊन करण्यात आले शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत फुल देऊन करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेत दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन शाळेच्या वतीने आनंदाने स्वागत करण्यात आले.
मागील शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा, निबंध, चित्रकला, वक्तृत्व व विज्ञान अशा विविध तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धा या मध्ये सहभाग घेऊन प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावुन शाळेचे नाव उज्ज्वल केले अशा सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवारांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र, शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला,
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी हे यशवंत नक्कीच प्रेरणास्थान ठरतील. पिंपळनेर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत 22 एप्रिल बुधवार रोजी प्रवेशोत्सव व नवागतांचे पुष्प देऊन दुहेरी आनंदाचा सोहळा थाटात साजरा झाला.
यावेळी मौलना अबरार कादरी यांनी सांगितले कि आज या पवित्र वातावरणात मुलांना शिक्षणाच्या वाटेवर पाहून मन प्रसन्न झाले, ते पुढे म्हणाले कि आपली भाषा जिवंत ठेवणे आणि सामाजिक जाणीव व उत्साह टिकवून ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, उर्दू ही केवळ भाषा नाही, तर ती आपली तहजीब, संस्कृती व अस्मिता आहे. या शाळेने आधुनिक शिक्षणासोबत आपल्या मातृभाषेचा वारसा जपला आहे. हे कौतुकास्पद आहे.
या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी हे सिद्ध करतात कि ते आपली कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. शिक्षणातून समाज घडतो. ही शाळा त्या दिशेने उत्तम कार्य करत आहे. अल्ल्हा या शाळेला अजून प्रगती देवो.असे यावेळी मौलना यांनी सांगितले.
यावेळी केंद्र प्रमुख मुकेश बाविस्कर सरांनी सांगितले कि या शाळेतील शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे, तसेच बाविस्कर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेच्या प्रगतिचा आढावा दिला. शिक्षक व एसएमसीच्या समर्पित कार्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवंत्ता वाढल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभर राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी गट शिक्षणधिकारी राजेंद्र पगरे केंद्र यांनी यावेळी सांगितले कि जिल्हा परिषद शाळा येथे आज होत असलेल्या प्रवेशोत्सव व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास उपस्थित राहून मला अत्यंत आनंद होत आहे,
एखादी शाळा केवळ इमारतीने मोठी होत नाही तर तेथील शिक्षकांच्या समर्पणाने मोठी होते. आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते कि या शाळेतील शिक्षकांवृदाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे.
मागील शैक्षणिक वर्षात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरावर विविध स्पर्धेमध्ये मिळवलेले यश हे शिक्षकांनी घेतलेल्या अतिरिक्त मेहनतीचे फळ आहे. 100% पटनोंदणी, गुणवंत्तापूर्ण अध्ययन व उपक्रमशील अध्यापन यासाठी मी सर्व शिक्षकांचे मनापासून कौतुक करतो
नवीन शैक्षणिक वर्षात दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. पालकांना माझी विनंती आहे कि, शिक्षकांवर विश्वास ठेवा. तुमची मुले सुरक्षित व योग्य हातात आहेत.
तसेच त्यांनी पुढे सांगितले कि शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे सहकार्यही उल्लेखनीय आहे. केंद्र स्तरावरून या शाळेला लागेल ती सर्व मदत करण्याचे मी आश्वासन देतो.
यावेळी अध्यक्षभाषणात विस्ताराधिकारी संजीव विभांडिक यांनी सांगिलते कि आज जिल्हा परिषद उर्दू शाळा पिंपळनेर येथे आयोजित प्रवेशोत्सव व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास उपस्थित राहून मला मनस्वी आनंद होत आहे.
आज शाळेत दाखल होणाऱ्या चिमुकल्यांचे मी मनापासून स्वागत करतो. हिच मुले उद्याचा भारत घडवतील. पालकांना माझी विनंती आहे कि मुलांना नियमित शाळेत पाठवा. तुमचे एक पाऊल त्यांच भविष्य उज्ज्वल करेल.
तसेच मागील वर्षी विविध स्पर्धाँमध्ये यश मिळवून शाळेचे व गावाचे नाव मोठे करणाऱ्या सर्व गुणवंतांचे मी अभिनंदन करतो. तुमचे यश इतरांसाठी दीपस्तंभासारखे आहे. शिक्षकांच्या मेहनतीला मी सलाम करतो असे यावेळी सांगितले.
मागील वर्षी विविध स्पर्धामध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आलेल्या मान्यवरांचे हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले,तसेच यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी Virtual Reality लॅबचा उद्धाटन विस्ताराधिकारी संजीव विभांडिक यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने ही लॅब सुरु करण्यात आली आहे,
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य अशफाक अली, जलाल अली, अरुण मावची यांनी केले तर परिश्रम मुख्याध्यपिका मुबशशेरा खान,शाळेतील शिक्षक वर्ग व माजी विद्यार्थी शामरीन शेख, मुस्कान शेख, अल्फीया सैय्यद, घेतले.व सूत्रसंचालन मुख्याध्यापिका मुबशशेरा खान यांनी यांनी केले तर आभार प्रदर्शन शोएब सर यांनी मानले.

यावेळी कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,पालक वर्ग,ग्रामस्थ, विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.यावेळी उपस्थित पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
