मुस्लिम दफनभूमी अतिरिक्त जागेची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..
शिरपूर/धुळे || दि. २६ जुलै २०२६ || (इकरार शेख)-:
शिरपूर येथील शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता मुस्लिम समाजासाठी असलेल्या दफनभूमी जागा अपुरी पडत असल्याने अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी दि २४ जुलै रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सविस्तर अशी की दि. २४ जुलै रोजी मुस्लिम समाजातील समाजसेवक नागरिकांनी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले गेले आहे की शिरपूर शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असून, सध्याच्या दफनभूमीत उपलब्ध जागा भविष्यातील गरजांच्या तुलनेत अपुरी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले.
मुस्लिम समाजाच्या या महत्त्वपूर्ण मागणीची मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी गांभीर्याने दखल घेऊन दफनभूमी साठी आवश्यक अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तातडीने सकारात्मक कार्यवाही करणार असा आश्वासन दिले.
दफनभूमी प्रश्न हा केवळ आजचा नसून भविष्यातील पिढ्यांशी संबंधित महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासन या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार का, याकडे आता शिरपूर मुस्लिम समाजाचे लक्ष लागले आहे.
निवेदन देता वेळी इम्रान शेख, आवेश शेख, बबलू शेख, राजू कपाट, शकील बाबा, मोईन शेख, कालू शेख,रिझवान बागबान, जुबेर बाबा, इकरार शेख, तबरेज खाटीक शाहिद शेख,साहिल शेख, इम्रान टेलर, सोनू, चिकू खाटीक, मोईन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते
