शासनाचा महसूल बुडवणाऱ्या त्या आरटीओ वर गुन्हा दाखल करा अन्यथा आमरण उपोषण करणार सामाजिक कार्यकर्ता गणेश ढेंगे…
नंदुरबार || दि.२२ नोव्हेंबर २०२४ || (फिरोज खान) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे कांतीलाल अहिरे वरिष्ठ लिपिक व जयसिंग बागुल लिपीक टंकलेखक कार्यरत असतांना यांनी अधिकाराचा गैरवापर करून नोंदी संपलेल्या मालिकेतील शिल्लक राहिलेल्या आकर्षक क्रमांकाचा वापर करून ८३ वाहनांची आणि वाहन ४.० या प्रणालीवर जिल्ह्याबाहेरील वाहन क्रमांक घेऊन परस्पर डाटा एन्ट्री करून ५० वाहनांची बोगस नोंदणी असा एकूण १३३ वाहनाच्या बनावट बॅकलॉग नोंदी केल्याने झालेल्या शसकीय महसूल हानीच्या पैकी फक्त ८३ वाहनाच्या शासकीय महसूल हानी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.३९५/२०२२, दिनांक २८/०६/२०२२ रोजी शासनाची अदांजित ६६,५९,९००/- रूपयाची फसवणूक केली. फिर्याद जयसिंग चुडामण बागुल, लिपीक टंकलेखक यांनी विलेली आहे.
परंतु वाहन ४.० या प्रणणालीवर जिल्ह्याबाहेरील वाहन क्रमांक घेऊन परस्पर डाटा एन्ट्री करून ५० वाहनाच्या बोगस नोंदणी केल्याने झालेल्या शासकीय महसूल हानी केल्याच्या प्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे एकूण १३३ वाहनाच्या बनावट बॅकलॉग नोंदीच्या आणि झालेल्या शासकीय महसूल हानी प्रकरणी किरण बिडकर तत्कालीन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार व उत्तम जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून फक्त ८३ वाहनाच्या शासकीय महसूल हानीचा गुन्हा कर्मचाऱ्या द्वारे दाखल केलेला आहे.
मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा.जिल्हाधिकारी, नंदुरबार आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टेशन नंदुरबार यांना ५० वाहनाच्या बोगस नोंदणी केलेल्या झालेल्या शासकीय महसूल हानीची माहिती चुकीची विलेली आहे. तसेच मला माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत चुकीची माहिती दिलेली आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे एकूण १३३ वाहनाच्या बनावट बॅकलॉग नोंदी केल्यामुळे झालेल्या शासकीय महसूल हानीस कांतीलाल अहिरे, वरीष्ठ लिपीक व जयसिंग बागुल लिपीक टंकलेखक आणि उत्तम जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार, किरण बिडकर, तत्कालीन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार हे पूर्णपणे जबाबदार असल्याने यांच्या कडून एकूण १३३ वाहनाच्या बनावट बॅकलॉग नोंदीमुळे झालेल्या शासकीय महसूल हानीचे ऑडीट करून वसुली करण्यात यावी आणि या सर्वांच्या विरूद्ध स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टेशन, नंदुरबार येथे गुन्हे दाखल करण्यात यावे.
माझ्या तक्रार अर्जाची तात्काळ दखल न घेतल्यास मला प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे येथे आमरण उपोषण करावे लागेल याची नोंद घ्यावी.अशा लेखी पत्र सामाजिक कार्यकर्ता गणेश ढेंगे यांनी दिला आहे.