नंदुरबारात पेट्रोल चोरांची दहशत; वाहनधारक त्रस्त….
नंदुरबार दि.३ जुलै २०२५ (फिरोज खान) :- पेट्रोल दर दररोज वाढत असताना नंदुरबारात पेट्रोल चोरीहि वाढत आहे.
नंदुरबारच्या चिराग अली मोहल्ला परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरासमोर उभे असलेल्या वाहनातून रात्रीच्या वेळी पेट्रोल चोरीला जात असलेल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने दुचाकीस्वार त्रस्त झालेले आहे.
परिसरात बंद दरवाजांची संधी शोधत पेट्रोलची चोरी केली जात आहे .त्यामुळे वाहन धारक या चोरापासून त्रस्त झाले आहेत.
चिराग अली मोहल्ला परिसरातून पेट्रोल चोरी वाढली आहे. पोलिसांनी तात्काळ सक्रिय पेट्रोल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
