हेरा इंग्लिश स्कुलचे वार्षिक समारंभ Annuol Function मोठ्या उत्साहात संपन्न…

हेरा इंग्लिश स्कुलचे वार्षिक समारंभ Annuol Function मोठ्या उत्साहात संपन्न….

नंदुरबार दि.१८ फेब्रुवारी २०२६ (फिरोज खान) :- नंदुरबार शहरातील हेरा इंग्लिश स्कुलचा दर वर्षी प्रमाणे यावर्षीही वार्षिक समारंभसोहळा Annuol Function उत्साहापूर्ण आणि दिमाखादार वातावरणात पार पडला.

शाळेच्या प्रांगानात सजविण्यात आलेल्या आकर्षिक व्यासपिठामुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहमुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता या कार्यक्रमासाठी रफिक नवाब जगीरदार मुख्याध्यापक मौलना अबुल कलाम आझाद विद्यालय अक्कलकुवा,युनूस सेठ नर्मदा एजन्सी वाले,पिरन सेठ अनमोल मार्बल वाले, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाचे अध्यक्ष सईद नुरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युनूस सेठ नर्मदा एजन्सी नंदुरबार, पीरन सेठ अनमोल मार्बल नंदुरबार, नगरसेवक सैय्यद रफअत हुसैन, आसिफ पिंजारी, जक्रिया मलक, सउद शेख, माजी नगरसेवक फारुख भाई मेमन, स्मित हॉस्पिटलचे संचालक शब्बीर भाई मेमन, बासीद सर, संस्थाचे सर्व संचालक मंडळ, गावातील प्रतिष्ठित नागरिकांब, तरुण मंडळी, विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमास आलेल्या प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे यांचे संस्था कडून शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पाकची आयात पठण करून करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले.ज्यामध्ये गायन, नाटक, आणि अन्य प्रतिभेचे प्रदर्शन होते विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन पाहून उपस्थित अतिथी आणि अभिभावक आनंदीत झाले, विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेल्या कार्यक्रमाने उपस्थितींची मने जिंकली.

अध्यक्षीय मनोगनात संस्थाध्यक्षसईद नुरी यांनी हेरा इंग्लिश स्कुलची आता पर्यंतची यशस्वी वाटचाल विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देताना आलेल्या अडचणी व त्यावर मात करत साधलेली प्रगती या विषयी मनोगत व्यक्त केले.

तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले प्रमुख अतिथी रफिक जगीरदार व नावेद काझी यांनी आपल्या भाषणातून शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यक्तिमत्व विकासात असलेले महत्व त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्याच्या आवडी – निवडी जपत त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचा संदेश त्यांनी पालकांना दिला.

तसेच या Annuol function कर्यक्रमात विजयत्या विध्यार्थ्यांना प्रमुख अतिथी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले, विध्यर्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान पाहण्यासारखे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुखसार मॅम, नमीरा मॅम आणि सफवान सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका अफसाना शेख मॅम यांनी मानले या भव्य सोहळ्यामुळे विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून शिक्षणा सोबतच कला, क्रीडा, व सांस्कृतिक क्षेत्रातही प्रगती करण्याचा आत्मविश्वास त्यांच्या मनात दृढ झाला आहे,नंदुरबार शहरातील हेरा इंग्लिश स्कुल शिक्षणा सोबत संस्कार आणि गुणवत्तेची परंपरा जपणारी संस्था म्हणून अधिक भक्कमपने उभी राहत असल्याचे या वार्षिक समारंभाने सिद्ध केले.ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थाचालक शाळेतील शिक्षक वर्ग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Call Us