आनंद, श्रद्धा आणि उत्साहाचा महासंगम! हजरत इमाम बादशाह बाबा यांचा ऐतिहासिक उरूस २७ जूनपासून; भव्य मेळाव्याने नंदुरबार सज्ज..

आनंद, श्रद्धा आणि उत्साहाचा महासंगम! हजरत इमाम बादशाह बाबा यांचा ऐतिहासिक उरूस २७ जूनपासून; भव्य मेळाव्याने नंदुरबार सज्ज..

नंदुरबार, दि. २३ जून २०२६ (फिरोज खान) :-नंदुरबार शहराच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेला, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जिवंत वारसा जपणारा आणि लाखो भाविकांच्या अटळ श्रद्धेचे केंद्र असलेला हजरत सैय्यद अलाउद्दीन चिश्ती उर्फ इमाम बादशाह बाबा (र.अ.) यांचा पावन उरूस सोहळा यंदा २७ जून २०२६, शनिवारपासून अत्यंत श्रद्धामय, उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सुरू होत आहे.

सुमारे साढे आठशे वर्षांची परंपरा लाभलेला हा उरूस केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गंगा-जमुनी तहजीब, सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावाचे अद्वितीय प्रतीक मानला जातो. बाबांच्या दरबारात धर्म, जात, पंथ यांचे भेद विरघळून जातात आणि श्रद्धेच्या एका धाग्यात संपूर्ण समाज एकत्र येतो.

बाबांच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने परतत नाही:
“जो बाबांच्या दरबारात येतो, त्याची झोळी कृपेने भरून जाते,” अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेने दरवर्षी हजारो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून उरूसमध्ये सहभागी होतात.

उरूसनिमित्त २५ जून रोजी दुपारी ३ वाजता भव्य संदल शरीफ मिरवणूक जामा मशिदीमागील मुजावर मोहल्ला येथून निघणार असून सायंकाळी मगरिबच्या नमाजानंतर पारंपरिक पद्धतीने दर्गाह शरीफ येथे संदल अर्पण करण्यात येणार आहे.

दर्गाहचे मुतवल्ली अब्दुल गनी मियाँ पिरजादे यांनी सर्व धर्मीय भाविकांना या पवित्र संदल सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

श्रद्धेसोबत मनोरंजनाची पर्वणी; भव्य उरूस मेळा २७ जूनपासून.

उरूस म्हटला की श्रद्धेबरोबरच आठवतो तो आनंद, उत्साह आणि खरेदीचा महासागर! वर्षभर ज्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो भव्य उरूस मेळा यंदाही २७ जूनपासून सुरू होत आहे.

मेळाव्यात एकीकडे बाबांच्या दरबारात भक्तीचा सुगंध दरवळणार आहे, तर दुसरीकडे मनोरंजन, खरेदी आणि आनंदाचा उत्सव रंगणार आहे.

###यंदाच्या मेळाव्याची खास आकर्षणे…

यावर्षी मेळाव्यात मनोरंजनाचा दुहेरी धमाका अनुभवायला मिळणार आहे. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी विविध आकर्षणे सज्ज आहेत.

🔹 विशाल पाळणे
🔹 ब्रेक डान्स झुला
🔹 मौत का कुआँ
🔹 मिक्सर झुला (नवीन आकर्षण)
🔹 टॉवर झुला (नवीन आकर्षण)
🔹 मिकी माउस जंपिंग जॅक
🔹 विविध साहसी व मनोरंजक राईड्स.

###खरेदीप्रेमींसाठीही सुवर्णसंधी…
मेळाव्यात रंगीबेरंगी आणि आकर्षक खेळण्यांची दुकाने, मुलांसाठी विविध वस्तू, घरगुती उपयोगाचे साहित्य, महिलांसाठी संसारोपयोगी वस्तू, कपडे, सजावटीच्या वस्तू आणि अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले जाणार आहेत.

कुटुंबासोबत खरेदी, मित्रांसोबत मनोरंजन आणि बाबांच्या दर्शनाने मनःशांती असा त्रिवेणी संगम या मेळाव्यात अनुभवायला मिळणार आहे.


सर्व धर्मीय बांधवांसाठी खुले निमंत्रण: श्रद्धा, बंधुता, संस्कृती आणि आनंदाचा अद्वितीय संगम असलेल्या हजरत इमाम बादशाह बाबा (र.अ.) यांच्या पावन उरूस सोहळ्यात आणि भव्य मेळाव्यात सहभागी होऊन या ऐतिहासिक परंपरेचे साक्षीदार व्हा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
“एकीकडे बाबांच्या दरबारातील अध्यात्मिक शांतता, तर दुसरीकडे मेळाव्याचा जल्लोष…

नंदुरबारकरांसाठी हा केवळ उत्सव नसून भावनांचा आणि एकतेचा महाउत्सव आहे.”

Call Us