जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या तयारीला जोरदार सुरूवात; जलूस मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती सुरू…

जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या तयारीला जोरदार सुरूवात; जलूस मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती सुरू…

जळगाव || दि. २ सप्टेंबर २०२५|| (विठ्ठल भालेराव)
जळगाव शहरात जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी (१२ रबी-उल-अव्वल) निमित्त काढण्यात येणाऱ्या जलूसाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. येत्या शुक्रवारी, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी नगर येथील उस्मानिया पार्कमधून जलूस निघणार आहे.

श्रद्धाळू व नागरिकांच्या सोयीसाठी जलूस मार्गावरील रस्त्यांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाजी नगरचे मा. नगरसेवक नवनाथ दारकुंडे साहेब यांच्या पुढाकाराने रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

या कामात जलूस कमिटी, विविध मशिदींचे जबाबदार तसेच उस्मानिया पार्क परिसरातील तरुण मंडळी सक्रिय सहभाग घेत आहेत.

कमिटीचे जबाबदार पदाधिकारी शेख फारुक कादरी, शेख इरफान नुरी, हाजी हुस्नोद्दीन हवलदार साहब, अ‍ॅड. मजहर भाई, हुजैफ कादरी, मजहर पठान, जावीद चाएना, पलंबर सुम्मा भाई ग्रुप, कामिल ठेकेदार ग्रुप, नौजवानाने मोहल्ला आयोजकांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जल्लोषात सहभागी व्हावे व बंधुभावाचा संदेश द्यावा.

Call Us