नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदासह एकूण ४१ पैकी २९ जागांवर दणदणीत विजय….
नंदुरबार दि. २१ डिसेंबर २०२५ (फिरोज खान) :- नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे बहुतांश प्रभागांवर निर्विवाद वर्चस्व दाखविला आहे.
दुरबार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालांनी शहरातील राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट केले असून शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीत एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
मतमोजणी पूर्ण होताच बहुतांश प्रभागंमध्ये शिंदे गटाच्या उमेदवरांनी दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.
शिंदे गटाने नगराध्यक्ष पदासह एकूण ४१ जागा पैकी २९ जागा पटकावल्या, भाजपाला केवळ ०८ जागांवर समाधान मानावे लागले तर एम आय एम पक्षांनी ०६ जागा पैकी ०४ जागा मिळवत खाते उघडला आहे.
नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शिवसेना ( शिंदे ) गटाच्या सौ रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या अविनाश महादू माळी यांचा ११ हजार ११० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
प्रभाग क्रमांक ०१ मध्ये अ आणि ब या दोन्ही जागांवर शिवसेना शिंदे गटने विजय मिळवला आहे, प्रभाग क्रमांक ०१ – अ – मधून वसावे कुणाल बटेसिंग यांनी तर प्रभाग क्रमांक ०१ – ब – मधून राजपूत ज्योती योगेश यांनी विजय संपदान करत शिंदे गटाची विजय सुरुवात केली या प्रभागात मतदारांनी स्पष्टपणे सत्ताधारी गटावर विश्वास दाखविला आहे.
प्रभाग क्रमांक ०२ मध्ये ही शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव कायम राहिला असून ०२ – अ – मधून ठाकूर टीना कमल आणि ०२ – ब – मधून कटारिया दीपक लालचंद यांनी विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक ०३ मध्ये शिवसेना शिंदे गटाने दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे, ०३ – अ – मधून साळुंके वंदना बाई कैलास यांनी विजय मिळवला आहे तर ०३ – ब – मधून राऊ दिलीप मोरे उर्फ राऊ बाबा यांनी बाजी मारली आहे.
प्रभाग क्रमांक ०४ मध्ये शिवसेना शिंदे गटने पुन्हा आपली ताकद सिद्ध केली असून ०४ अ – मधून वळवी मनीषा चेतन आणि ०४ – ब – मधून गुरव भावना प्रवीण यांनी विजय मिळवला आहे, या प्रभागातील निकालाने शिंदे गटाची पकड अधिक मजबूत झाली.
प्रभाग क्रमांक ०५ मध्ये ही शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकला असून ०५ – अ – मधून पटेल भावना शीतल आणि ०५ – ब – मधून जैन देवेंद्र चंदनमल उर्फ देवा बापू यांनी विजय होत मतदारांचा विश्वास संपदान केला आहे.
प्रभाग क्रमांक ०६ मध्ये दोन्ही जागांवर शिवसेना शिंदे गटचे उमेदवार विजय झाले आहे ०६ – अ – मधून पाटील हर्षदा सुनील आणि ०६ – ब – मधून रघुवंशी यशवर्धन मनोज उर्फ लकी भैय्या यांनी विजय मिळवला असून या प्रभागत ही शिंदे गटाचा दबदबा कायम राहिला आहे.
प्रभाग क्रमांक ०७ मध्ये शिवसेना शिंदे गटने पुन्हा आपली ताकद सिद्ध केली असून ०७ – अ – मधून रघुवंशी किरण मनोहरसिंग आणि ०७ – ब – मधून गिरासे मनकोर ठाण सिंग ( पप्पू मामा ) यांनी विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक ०८ मध्ये अ आणि ब या दोन्ही जागांवर शिवसेना शिंदे गटने विजय मिळवला आहे, ०८ – अ – मधून राजपूत सोनिया विनोद तर ०८ – ब – मधून रघुवंशी अमित रणवीरसिंग यांनी विजय संपदान केला आहे.
प्रभाग क्रमांक ०९ मध्ये शिवसेना शिंदे गटने पुन्हा आपली ताकद सिद्ध केली आहे, ०९ – अ – मधून वसावे शीतल कुणाल आणि ०९ – ब – मधून पवार रवींद्र अशोक यांनी विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेना शिंदे गटाचे १० – अ – मधून दिघे दिपक प्रभाकर उर्फ भाऊ यांनी बाजी मारली तर १० – ब – मधून भारतीय जनता पक्षाच्या मराठे नीता सतीश यांनी विजय मिळवत भाजचे खाते उघडले आहे.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये ११ – अ – मधून शिवसेना शिंदे गटचे सोनार हर्षल संजय आणि ११ – ब – मधून शिवसेना शिंदे गटचे रघुवंशी सायली जय यांनी विजय मिळवत शिवसेना शिंदे गटने आपली ताकद सिद्ध केली आहे.
प्रभाग क्रमांक १२ अ आणि ब गटातून एम. आय. एम. पक्षाने बाजी मारली १२ – अ – मधून सालेहा बेगम ( बबलू पाकिजा )यांनी विजय मिळवत एम आय एम चे खाते उघडले आणि १२ – ब – मधून सय्यद रफअत हुसैन सदकात हुसैन यांनी विजय संपदान केला आहे.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाने दोन्ही जागांवर बाजी मारली असून १३ – अ – मधून ढनढोरे प्रीतम प्रकाश आणि १३ – ब – मधून कुरेशी साकीना बी शेख रोशन यांनी विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक १४ मध्ये भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे १४ – अ – मधून माळी सारिका लक्ष्मण आणि १४ – ब – मधून माळी आनंद बाबुराव यांनी विजय संपदान केला आहे.
प्रभाग क्रमांक १५ मध्ये एम आय एम पक्षाने दोन्ही जागांवर विजय संपदान केला असून १५ – अ – मधून पिंजारी आसिफ ( बाबू सामोसा वाला ) आणि १५ – ब – मधून मलक साजेदा बी अशफाक यांनी विजय संपदान केला आहे.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये भारतीय जनता पक्षाचा एक तर शिवसेना शिंदे गटचा एक उमेदवार विजय झाला असून १६ – अ – मधून चौधरी रेखा प्रवीण ( भाजप ) तर १६ – ब -मधून शिंदे गटाचे चौधरी प्रथमेश शिरीष यांनी विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक १७ मध्ये भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागांवर बाजी मारली असून १७ – अ – मधून गावीत सुषमा धर्मेंद्र तर १७ – ब – मधून चौधरी पंकज नामदेव यांनी विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक १८ मध्ये शिवसेना शिंदे गटाने दोन्ही जागांवर विजय मिळवला असून १८ – अ – मधून अहिरे वंदना रवींद्र तर १८ – ब – मधून चौधरी गौरव नरेंद्र यांनी बाजी मारली आहे.
प्रभाग क्रमांक १९ मध्ये भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागांवर विजय मिळवला असून १९ – अ – मधून चौधरी हिरालाल मगन तर १९ – ब – मधून चौधरी शोभा भरत यांनी बाजी मारली आहे.
प्रभाग क्रमांक २० मध्ये शिवसेना शिंदे गटाने तिन्ही जागांवर बाजी मारली असून २० – अ – मधून चौधरी रेखा भरत २० – ब – मधून राजपूत वैष्णवी मोहितसिंग आणि २० – क – मधून पाटील कैलास हिंमतराव यांनी विजय संपदान केला आहे.
