जळगाव महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्रमांक 2 मध्ये रहीम शेख व हर्षदा सांगोरे यांच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ…
जळगाव ||दि. ०४ जानेवारी २०२६ || {विठ्ठल भालेराव}-: जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 2 मध्ये उमेदवार अब्दुल रहीम अब्दुल हक शेख (उर्फ बाबुभाई, बाबू दादा) यांचा प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज शनिवार, दि. 4 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ते अनुक्रमांक 8 – ‘शिट्टी’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उभे आहेत.
या प्रचाराच्या शुभारंभी पूर्ण वार्डाची भव्य बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वार्डातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असून, रहीम शेख यांना दिवसेंदिवस वाढता जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. याच कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 2-ब मधील उमेदवार हर्षदा अमोल सांगोरे (अनुक्रमांक 5 – नारळ चिन्ह) यांचाही सहभाग होता. शिवाजीनगर परिसरासह संपूर्ण प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दिला.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास अमोल सांगोरे, विलास सांगोरे, हाजी मसूद दादा, हाजी फिरोज दादा, अखिल पैलवान, शकील बागवान, ॲड. आरिफ सय्यद, जावेद सय्यद, समीर भाई खाटीक, इकबाल शेख, युसुफ शहा, विकी भाई, जावेद दादा उर्फ पप्पू भाई, हमीद पैलवान यांच्यासह वार्ड क्रमांक 2 मधील असंख्य रहिवासी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा केली. परिसरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नागरी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडणूक वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र असून, आगामी दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
