जळगाव महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला…

जळगाव महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला
भाजपने गाठला बहुमताचा आकडा; महापौरपद निर्विवाद, उपमहापौरपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता…

जळगाव || दि१६जानेवारी २०२६ || (प्रतिनिधी विठ्ठल भालेराव)-: जळगाव महानगरपालिकेवर अखेर महायुतीचा भगवा फडकला आहे. ७५ सदस्यीय जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे.

आज, दि. १६ जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीनंतर भाजपने एकहाती ४६ जागा जिंकून बहुमताचा ३८ चा आकडा सहज पार केला आहे.

शिंदेसेनेला २२, शिवसेना (उबाठा) गटाला ५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १ तर १ अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. याआधीच भाजपचे ६ व शिंदेसेनेचे ६ असे एकूण १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

महायुतीमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश असल्याने जळगाव महापालिकेतील सत्ता स्थापनेत कोणतीही अडचण राहिलेली नाही. त्यामुळे भाजपचा महापौर निर्विवाद होणार असून उपमहापौरपद शिवसेनेला (शिंदे गट) मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार प्रफुल्ल देवकर यांना स्थायी समिती सभापतीपद किंवा एखादे महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षीय बलाबल (एकूण ७५ जागा)
भाजप : ४६
शिवसेना (शिंदे गट) : २२
शिवसेना (उबाठा) : ५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : १
अपक्ष : १

प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी…

प्रभाग क्र. १
अ – रिता विनोद सपकाळे (भाजप)
ब – दिलीप बबनराव पोकळे (शिवसेना)
क – संगीता दांडेकर (शिवसेना)
ड – भारती सागर सोनावणे (अपक्ष)

प्रभाग क्र. २
अ – सागर शामकांत सोनवणे (शिवसेना)
ब – उज्ज्वला किशोर बाविस्कर (शिवसेना)
क – पूजा विजय जगताप (भाजप)
ड – विजय गजानन बांदल (भाजप)

प्रभाग क्र. ३
अ – अर्चना संजय पाटील (भाजप)
ब – प्रतीक्षा कैलास सोनवणे (भाजप)
क – प्रवीण रामदास कोल्हे (शिवसेना)
ड – निलेश विशवनाथ तायडे (भाजप)

प्रभाग क्र. ४
अ – शशीबाई शिवचरण ढंढोरे (भाजप)
ब – विद्या मुकुंद सोनावणे (भाजप)
क – कल्पेश कैलास सोनवणे (भाजप)
ड – पियुष ललित कोल्हे (शिवसेना)

प्रभाग क्र. ५
अ – विष्णू रामदास भंगाळे (शिवसेना)
ब – मंगला संजय चौधरी (शिवसेना)
क – आशा रमेश पाटील (भाजप)
ड – नितीन बालमुकुंद लड्ढा (भाजप)

प्रभाग क्र. ६
अ – अर्शिन बानो शोएब खाटीक (उबाठा)
ब – शुचिता अतुल हाडा (भाजप)
क – अमित पांडुरंग काळे (भाजप)
ड – दीपक प्रभाकर सूर्यवंशी (भाजप)

प्रभाग क्र. ७
अ – दीपमाला मनोज काळे (भाजप)
ब – अंकिता पंकज पाटील (भाजप)
क – विशाल सुरेश भोळे (भाजप)
ड – चंद्रशेखर अत्तरदे (भाजप)
प्रभाग क्र. ८
अ – सागर पाटील (भाजप)
ब – मानसी निलेश भोईटे (भाजप)
क – अमर जैन (भाजप)
ड – नरेंद्र आत्माराम पाटील (शिवसेना)

प्रभाग क्र. ९
अ – मनोज सुरेश चौधरी (शिवसेना)
ब – प्रतिभा गजानन देशमुख (शिवसेना)
क – जयश्री राहुल पाटील (भाजप)
ड – चंद्रशेखर शिवाजी पाटील (भाजप)

प्रभाग क्र. १०
अ – सुरेश माणिक सोनवणे (भाजप)
ब – माधुरी अतुल बारी (भाजप)
क – कविता किरण भोई (भाजप)
ड – जाकीर खान रसूल खान (भाजप)

प्रभाग क्र. ११
अ – डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे (शिवसेना)
ब – संतोष मोतीराम पाटील (शिवसेना)
क – सिंधुताई विजय कोल्हे (शिवसेना)
ड – ललित विजय कोल्हे (शिवसेना)

प्रभाग क्र. १२
अ – अनिल अडकमोल (भाजप)
ब – उज्ज्वला बेंडाळे (भाजप)
क – गायत्री राणे (भाजप)
ड – नितीन बरडे (भाजप)

प्रभाग क्र. १३
अ – नितीन सपके (भाजप)
ब – सुरेखा नितीन तायडे (भाजप)
क – वैशाली अमित पाटील (भाजप)
ड – प्रफुल्ल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी – अजित पवार गट)

प्रभाग क्र. १४
अ – सुनील सुपडू महाजन (भाजप)
ब – जयश्री सुनील महाजन (भाजप)
क – राबियाबी अमजद खान (भाजप)
ड – रितिका संजय ढेकळे (भाजप)

प्रभाग क्र. १५
अ – अरविंद देशमुख (भाजप)
ब – कलाबाई नारायण शिरसाळे (भाजप)
क – रेशमा कुंदन काळे (शिवसेना)
ड – प्रकाश बालाणी (भाजप)

प्रभाग क्र. १६
अ – डॉ. वीरेन खडके (भाजप)
ब – वंदना संतोष इंगळे (भाजप)
क – रंजना विजय वानखेडे (भाजप)
ड – सुनील वामनराव खडके (भाजप)

प्रभाग क्र. १७
अ – जरीनाबी शब्बीर शहा (उबाठा)
ब – हीनाबी शाकीर खान (उबाठा)
क – इब्राहिम पटेल (उबाठा)
ड – अक्षय वंजारी (उबाठा)

प्रभाग क्र. १८
अ – डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे (शिवसेना)
ब – नलूबाई तुळशीदास सोनवणे (शिवसेना)
क – अनिता सुरेश भापसे (शिवसेना)

प्रभाग क्र. १९
अ – रेखा चुडामण पाटील (शिवसेना)
ब – गणेश (विक्रम) सोनवणे (शिवसेना)
क – निकिता दुर्गेश वंजारी (शिवसेना)
ड – राजेंद्र घुगे पाटील (भाजप)

Call Us