धुळे वाहिद काकर
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्या विरोधात तात्काळ एफआयआर दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज, २६ जून रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षातर्फे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले.
मुस्लिम समाजात तीव्र रोष; सखोल चौकशीची मागणी
AIMIM च्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाजिया इलाही खान यांनी विविध माध्यमांवर तसेच एका मुलाखती दरम्यान हजरत मोहम्मद पैगंबर, हजरत आयशा तसेच मजार, मशिदी आणि मदरसे आदींबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली आहेत. या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे संपूर्ण मुस्लिम समाजात तीव्र रोष व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित व्हिडिओ, सोशल मीडिया पोस्ट व इतर उपलब्ध पुराव्यांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास खान यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळात ‘या’ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
निवेदन सादर करताना AIMIM चे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक लल्लू सेठ, जावेद बिल्डर, शब्बीर पिंजारी, साजिद अली साई, वसीम मंत्री, सऊद सरदार, शोएब बेग मिर्झा, आमिर पठाण ,पप्पू भैया मसाले वाले, शोएब पाल्टा, जाविद अब्दुल लतिफ, मोईन शेख, जैद झाकीर, फैसल अन्सारी, सऊद आलम, शाबान अन्सारी, शोएब अन्सारी, मुज्जू शेख, आसिफ किराणा आदी सहकाऱ्यांचा समावेश होता.
