धुळे
शहरातील मोकळ्या व प्रशस्त रस्त्यांवर मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांना लक्ष करून सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘अँटी चेन स्नॅचिंग विरोधात पेट्रोलिंग’ तीव्र केले असून, स्वतः पोलीस सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार रस्त्यावर उतरून महिलांशी थेट संवाद साधत जनजागृती करत आहेत.
हायस्पीड बाईकवरून येणारे चोरटे पादचारी महिलांना गाठून “तुकाराम किंवा सखाराम इथे राहतात का?” असा खोटा पत्ता विचारतात. महिलांचे लक्ष विचलित होताच, अत्यंत वेगाने गळ्यातील सोनसाखळी ओढून पसार होतात. मोकळ्या रस्त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या या चोरट्यांपासून सावध राहण्यासाठी पीएसआय विवेक पवार यांनी महिलांना मोलाचा कानमंत्र दिला आहे.
विवेक पवार यांचे नागरिकांना आवाहन
- फिरताना शक्यतो मौल्यवान दागिने अंगावर घालणे टाळावे किंवा ते सुरक्षितपणे झाकून ठेवावेत.
- रस्त्यात कोणीही अनोळखी बाईकस्वार पत्ता विचारण्यासाठी थांबल्यास त्याच्याशी संवाद साधणे टाळावे.
- संशयास्पद व्यक्ती पत्ता विचारत असल्यास, स्वतःच्या दागिन्यांवर हात ठेवून आधी सतर्क व्हावे.
पोलीस प्रशासनातर्फे दररोज दोन तास विशेष गस्त घातली जात आहे. मात्र, नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षेसाठी अधिक जागरूक राहावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
या वेळी API विवेक पवार, PSI काळे, प्रमोद बुटे, ललितचंद चौधरी, सिराज खाटीक, चेतन देवरे, राकेश मोरे यांनी जनजागृति केले.
