नंदुरबार जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम — अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले फॉरेन्सिक वाहनाचे उद्घाटन….

जिल्हा पोलीस दलात अत्याधुनिक फॉरेन्सिक वाहनाचा समावेश; जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे हस्ते लोकार्पण…

नंदुरबार || दि. २८ ऑगस्ट २०२५ || (फिरोज खान):- नंदुरबार जिल्हयातील घडणाऱ्या गंभीर गुन्हयांचा तात्काळ व अचूक तपास होणेसाठी राज्य शासनाकडून जिल्हा पोलीस दलासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलात या वाहनाच्या समावेशामुळे जिल्हयात घडणाऱ्या गुन्हयांचे घटनास्थळी तात्काळ पोहोचून भौतिक, रासायनिक, जैविक तसेच डिजीटल पुरावे गोळा करण्यात येणार आहेत.

त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाईसाठी व न्यायप्रक्रियेसाठी आवश्यक भक्कम पुरावे मिळणे शक्य होणार आहे.या व्हॅनमुळे तपासी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असुन जिल्हयातील नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास वृध्दींगत होईल, असा विश्वास यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी व्यक्त केला. तसेच अजुन 2 फॉरेन्सिक वाहनांचा लवकरच जिल्हा पोलीस दलात समावेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, वाचक सहा. पोलीस निरीक्षक जयेश खलाणे तसेच फॉरेन्सिक टीम व इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते.

Call Us