उपनगर हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश..!
एकुण 52 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने व कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत..
नंदुरबार दि. 09 डिसेंबर 2026 (फिरोज खान) :- दि. 05/01/2026 उपनगर पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं. 04/2026 भा. न्या. संहिता कलम 305 (अ), 331(3) वगैरे गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की,
वरील नमुद गुन्हा हा एकता नगर परिसरातील इसम नामे गुरुपाल शिकलीकर व त्याचे साथीदार अशांनी मिळुन केला आहे, अशी खात्रिशीर बातमी मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच पथकास बातमीची खात्री करुन कारवाईकामी रवाना केले.
मिळालेल्या गोपनिय माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने एकता नगर परिसरात गुरुपाल शिकलीकर याचा शोध घेतला असता तो त्याचे साथीदारासह मिळुन आला.
त्यांना त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे
- गुरूपाल कप्तान शिकलीकर, वय 18 वर्षे, रा. एकता नगर, नंदुरबार
- (विधीसंघर्षग्रस्त बालक), रा. एकता नगर, नंदुरबार असे सांगितले. त्यांना वरील नमुद घर फोडीचे गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हयाची हकिगत सांगत कबूली दिली. तसेच गुन्हयातील गेला मालाबाबत विचारणा करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना अधिकचे विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी घराचे बाहेरील असलेल्या बाथरुम मधील एका कप्प्यातुन बॅग काढून दिली. सदर बॅगेची पंचांसमक्ष पाहणी करता त्यामध्ये वर नमुद घरफोडीचे गुन्हयात चोरी केलेला एकुण 52,400/- रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये चांदीचे दागिने, कॅमेरा असे हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोहेकॉ/अजित गावीत, राकेश मोरे, पोकॉ/अभय राजपुत, रामेश्वर चव्हाण, सतीश घुले, आनंदा मराठे अशांनी केली आहे.
