सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साजिद सैय्यद यांचा सेवानिवृत्तीनिमित्त साक्री पोलीस स्टेशन येथे सत्कार समारंभ…

धुळे/साक्री || दि.०२ जुन २०२५ || {प्रशांत कोलते} -: सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साजिद सिकंदर सैय्यद यांचा सेवानिवृत्ती निमित्त साक्री पोलीस ठाण्यात सत्कार समारंभ पार पडला. साजिद सैय्यद हे धुळे जिल्हा पोलीस दलात ३२ वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झाले. ३२ वर्षांच्या कालावधीत साजिद सैय्यद यांनी धुळे पोलीस मुख्यालय, पिंपळनेर पोलीस स्टेशन, सोनगीर पोलीस स्टेशन, थाळनेर पोलीस स्टेशन, शिरपूर पोलीस स्टेशन, आणि साक्री पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे पोलीस सेवेचे कर्तव्य पार पाडले.

पोलीस दलात अत्यंत हुशार, शांत, मनमिळाऊ, प्रामाणिक अशा स्वभाव गुणांनी त्यांनी सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. पोलीस सेवेत येण्यापूर्वी त्यांनी साक्री तालुक्यातील फोफरे या गावाचे रहिवाशी असुन गावात शाळकरी मुलांच्या शिकवण्या घेत स्वतःचेही शिक्षणहीपूर्ण केले.

शिक्षणानंतर धुळ्यात येऊन साजिद सैय्यद यांनी सुरुवातीला पत्रकारिताही केली. जगतराव सोनवणे यांच्या मतदार या वृत्तपत्रात व त्यांनी वार्ताहर म्हणून काम केले. पत्रकारिता सुरू असतानाच ते धुळे जिल्हा पोलीस दलात भरती व झाले. त्यानंतर पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी कर्तव्य पार पाडले. त्यांच्या सत्कार समारंभात पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी साजिद सैय्यद यांच्या कारकिर्दीचा प्रशंसनीय गौरव केला.

जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी देखील साजिद सैय्यद यांना सेवानिवृत्तीच्या पुढील आयुष्यासाठी य शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Us