हज यात्रेस जाणाऱ्या भाविकांना फाऊंडेशनकडून शुभेच्छांसह सन्मान….

हज यात्रेस जाणाऱ्या भाविकांना फाऊंडेशनकडून शुभेच्छांसह सन्मान..

नंदुरबार ||दि.२६ मार्च २०२६ ||-: (फिरोज खान) नंदूरबार येथील ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन तर्फे पवित्र हज व उमरा यात्रेसाठी मक्का-मदिना येथे जाणाऱ्या हज यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी नंदुरबार येथून दहा हज यात्रेकरू मक्का-मदिना यात्रेसाठी रवाना झाले.


कार्यक्रमात सर्व यात्रेकरूंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या सुखरूप आणि यशस्वी यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या यात्रेकरूंमध्ये सैय्यद मकसुद, रऊफ शाह, गुलाम दस्तगीर, सैय्यद साहील, सलीम शेख, सैय्यद शकीला, फरजाना शाह, मुमताज बानो, नसीम शेख आणि परवीन बानो यांचा समावेश आहे.


यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी सांगितले की, इस्लाम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांनी मानवता, दया, प्रेम आणि शांततेचा संदेश दिला आहे. मक्का-मदिना ही पवित्र स्थळे असून येथे भाविक आपली धार्मिक विधी, भक्ती, उपासना व प्रार्थना करतात. हज व उमराचा प्रवास सुखरूप पार पडावा तसेच नंदुरबार जिल्ह्यात शांतता व भाईचारा कायम राहावा, यासाठी प्रार्थना करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमास निशाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप सोनवणे, सामाजिक न्याय व हक्क परिषदेचे अध्यक्ष अरुण रामराजे, पत्रकार राजेंद्रकुमार बुवा, शकील खतिब, ओबीसी ऑर्गनायझेशनचे शहर उपाध्यक्ष अजिम बागवान, तैय्यबा शेख, आप्पा वाघ, युसुफ शेख, कामिल शेख, सादीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Call Us