आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता समिती बैठकीचे आयोजन..

आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे शांतता समिती बैठकीचे आयोजन..

नंदुरबार || दि. 19 ऑगस्ट 2026 || (फिरोज खान) :- जिल्हयाभरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थित

आगामी दि. 14/09/2026 रोजीच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातर्फे दि.18/08/2026 रोजी नंदुरबार शहरातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हॉल, जुनी नगरपालिका, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हयातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

सदर बैठकीत आगामी गणेशोत्सवाचे काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्यामध्ये गणेश मंडळांचे परिसरातील सुरक्षा व्यवस्था, वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे नियंत्रण, मिरवणूक पारंपारिक मार्गानेच काढावी व मार्गात कोणताही बदल करू नये तसेच मार्गावरील सुरक्षा व्यवस्था तसेच वेळेचे बंधन पाळणे, सी.सी.टी.व्ही. देखरेख, आपत्कालीन सेवांची उपलब्धता, तसेच ध्वनीप्रदुषण नियंत्रणासंबंधी नियम पाळणे, प्रत्येक मंडळाने रात्र व दिवस अशा दोन्ही वेळेस स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, आक्षेपार्ह पोस्ट, देखावे, बॅनर लावु नये अशा विविध मुद्दयावर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचेकडुन सुचना तसेच मार्गदर्शन करण्यात आले.

याव्यतिरिक्त गणेशात्सव साजरा करतांना जे मंडळ अंमली पदार्थ सेवना चे दृष्ट परिणामांबाबत जागृती मोहिम राबवतील अशा मंडळांच्या पोलिस दलामार्फत सत्कार करण्यात येईल.

बैठकीदरम्यान जिल्हयाभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या गणेश मंडळांचे प्रतिनिधींनीही आपले मत व अडचणी मांडल्या. तसेच गणेशोत्सवाचे दरम्यान जिल्हा पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

यावेळी बोलतांना जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी नागरिकांना आवाहन केले की, “गणेशोत्सव हा आनंद, भक्ती, श्रद्धा व सामाजिक एकतेचा सण असून तो शांततेत, सुरक्षिततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करावे.

कोणत्याही प्रकारचा धार्मिक वाद, अफवा किंवा गोंधळ निर्माण होऊ न देता पोलीस प्रशासनास सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्यास आढळून आल्यास त्याबाबत जिल्हा पोलीस दलास कळवावे”.

सदर कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, कार्यकारी अभियंता महावितरण विभाग नंदुरबार गायधनी, नगरपालिका बांधकाम विभाग, नंदुरबार गावीत , पोलीस निरीक्षक संदिप पाटील, नंदुरबार शहर, पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, उपनगर, जिल्हा वाहतुक शाखा, नंदुरबार पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर वाहतुक शाखा, नंदुरबार, स.पो.नि. जगदीश गावीत तसेच जिल्हयाभरातील 70 ते 80 विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी असे उपस्थिती होती.

Call Us