नंदुरबार बसस्थानक परिसरात विशेष कॉम्बिंग मोहीम; टवाळखोर व संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई…
नंदुरबार || दि. 19 ऑगस्ट 2026 || (फिरोज खान) :- नंदुरबार शहरातील बसस्थानक परिसरात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासोबतच टवाळखोरी, संशयास्पद हालचाली तसेच अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी नंदुरबार शहर पोलिसांकडून विशेष कॉम्बिंग मोहीम राबविण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार उपविभाग हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, नंदुरबार शहर पोलीस ठाणे तसेच पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा वाहतुक शाखा, नंदुरबार यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
सदर मोहीमेदरम्यान बसस्थानक परिसरात विनाकारण फिरण्याऱ्या, टवाळखोरी करणाऱ्या तसेच संशयास्पदरीत्या आढळून आलेल्या इसमाची तपासणी करण्यात आली.
या कारवाईत एकुण-12 इसमाविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 9 पुरूषविरूद्ध सार्वजनिक ठिकाणी विनाकारण टवाळखोरी करून सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या अनुषंगाने, तर 3 महिलांविरूदध रस्त्यावर अश्लील हावभाव करून लोकांना आकर्षित करण्याच्या अनुषंगाने, महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.
बसस्थानक परिसरात वारंवार होणारी वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्याकरीता अनाधिकृत उभी करणारे वाहनचालक तसेच टॅक्सीचालक यांची बैठक घेऊन वाहतुक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक सुचना दिल्या आहेत.
नंदुरबार जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या आजुबाजूला कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, संशयास्पद हालचाल, अनुचित प्रकार दिसुन आल्यास त्वरीत डायल 112 या क्रमांकावर संपर्क साधाव तसेच किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहान नंदुरबार पोलिसांकडुन करण्यात आले आहे.
